Monday, 29 February 2016

सूचना

दहावी विद्यार्थ्यांसाठी सूचना

1.प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत हवे.
2. निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करा.
3 बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय ,बैठक क्रमांकाची खात्री करा.
4.उपस्थिती पत्रिकावर बैठक क्रमांक ,बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करा.
5.बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवर चिकटवा.
6.बैठक क्रमांक अंकात व अक्षरात बिनचूक लिहा.
7.उत्तरपत्रिकेवर कोणत्याही देवाचे नाव लिहू नये, अन्यथा गुण कमी होऊन एका परीक्षेस बसता येणार नाही.
8.उत्तरपत्रिकेची पाने सुस्थितीत असल्याची खात्री करा.
9.उत्तरपत्रिकेच्या पान क्रमांक तीनपासून लिहा .
10.उत्तरपत्रिकेवर उत्तरे लिहिताना खाडाखोड करू नका.
11.उत्तरपत्रिकेच्या केवळ डाव्या बाजूस  समास सोडा.
12.उत्तरपत्रिका किंवा पुरवणीचे पान फाडू नका.
13.उत्तरपत्रिका,पुरवणीवर पर्यवेक्षकांची स्वाक्षरी घ्या .
14.कच्चे लिखाण उत्तरपत्रिकेच्या डाव्या बाजूला पेन्सिलीने करा.
15.त्या पानावर कच्चे लिखाण असा उल्लेख करा.
16.आकृतीसाठी साध्या पेन्सिल वापरा.
17.शेवटच्या अर्धा तासात मुख्य उत्तरपत्रिकेवर व पुरवणी घेतली असेल तर होलोक्राफ्ट योग्य त्या ठिकाणी चिकटवा .
18. मुख्य उत्तरपत्रिकेवरील पुरवणीचा टेबल पूर्ण करा.
19.रिकाम्या पानावर रेषा ओढा.

■  पालकांसाठी सूचना  ■

1.पाल्यावर अतिरिक्त दडपण टाकू नका.
2.स्वतः तणावात राहू नका.
3.पाल्याच्या आहाराची काळजी घ्या .
4.वाढत्या ट्रँफिकमुळे अर्धा तास लवकर घरातून बाहेर पडा.
5.परीक्षा केंद्रात जाऊ नका.
6.पाल्याची पुरेशी झोप होऊ द्या .
7.बाहेरील खाद्यपदार्थ देऊ नका.
8.प्राणायाम ,योगा असे सोपे व्यायाम करून घ्या .
9.शुद्ध किंवा उकळून कोमट केलेले पाणी   वापरा.

केंद्र व शाळांसाठी

1.परीक्षा नंबर कसा लिहावा याचा सराव करून घ्यावा.
2.वेळेचे नियोजन सागांवे.
3.केंद्रावर वातावरण तणावपूर्ण नको.
4.अपंग किंवा विकलांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक असावा.
5.परीक्षा केंद्रावर डॉक्टरची सोय असावी
6.परीक्षा  हॉलमध्ये कागदांचे तुकडे ही नसावेत .
7.साडेअकरापर्यंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे .

सर्व दहावीच्या विद्यार्थ्याना परिक्षेच्या हार्दिक शुभेच्छा
◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇◆◇

Education_Katta
Email:- Info@EducationKatta.Com

No comments:

Post a Comment

Popular Posts