Saturday, 9 December 2017

1

■ 'अंत' आणि एकांत ह्यापैकी आपण एकांतालाच जास्त घाबरतो

■ खराब अक्षर हे अर्धवट शिक्षणाचे लक्षण होय.

■ ज्ञान म्हणजे काय? इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार.

■ नवं काहीतरी शिकण्यासाठी 'मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी

■ पुस्तकांच्या शिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे "आयुष्य "

■ विद्या विनयेन शोभते

■ हसा, खेळा पण शिस्त पाळा.

■ केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

■ कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करु नका.

■ कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल , तर अपयश पचविण्यास शिका.

■ खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी हि त्याच्या साठी नवीन काहीतरी शिकण्याची संधी असते

■ कधी तुम्ही जिंकत असता कधी तुम्ही शिकत असता

■ राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

■ देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

■ चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

■ यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्वाचा धडा आहे

■ कला म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचे संमेलन.

■ यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

■ जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

■ बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.

■ चुक हि नवी संधी आहे कधी न शिकलेले शिकण्याची

■ छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही... अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते... कारण... छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात... पण... अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.....!

■ दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही, आत ज्योत ही हवीच.

■अन्न हे पूर्णब्रह्म आहे; त्याचा अनादर करू नका.

■ नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ.

■ परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

■ प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

■ यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायर्‍या चढाव्या लागतात.

■ यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

■ वाचन हे मनाचे अन्न आहे.

■ वाचनासाठी वेळ काढा, तो शहाणपणाचा निर्झर आहे.

■ विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे.

■ "यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं"

■ आधी सिध्द व्हा, मग आपोआपच प्रसिध्द व्हाल

■ शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

■ अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

■ अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.

■ अर्धवट ज्ञानी म्हणजे दुःखाचा धनी.

■ कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही.

■ खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

■ चारीत्र्यवान मनुष्यच खरा सुशिक्षित.

■ जो द्रव्य वाढवितो तो काळजी वाढवतो, परंतु जो विद्या वाढवितो, तो ज्ञान वाढवतो.

■ ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते.

■ ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चात्रित्र्य निर्माण करणे हेच असले पाहिजे.

■ दुसऱ्याचा विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित.

■ नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे.

■ परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

■माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.

■ प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

■ प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे.

■ पुस्तके म्हणजे मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा आहे.

■ पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही.

■ या ह्रदयीचे त्या ह्रदयी देता येते तोच खरा शिक्षक.

■ वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

■ विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.

■ विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

■ शब्दांसारख शस्त्र नाही, त्यांचा वापर जपुनच करावा.

■ शरीराला श्रमाकडे, बुध्दीला मनाकडे आणि ह्रदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण.

■ शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे, जे वापरून तुम्ही प्रत्यक्ष जग बदलताना बघू शकता.

■ शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो, तर विद्यार्थ्यालाच त्यातुन प्रवेश करायचा असतो.

■ समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.

■ स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !

■ शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

■ स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.

■ दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही

■ त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)

■ युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.

■ जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!

■ जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते
.
■ लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.

■ आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.

■ सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.

■ माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.

■ दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.

■ आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.

■ सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !

■ उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.

■ जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.

■ संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.

■ ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.

■ शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.

■ कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!

■ मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.

■ अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.

■ चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.

■ काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.

■ कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.

■ उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.

■ कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.

■ पवित्र असावे पण पतित होऊ नये.

■ त्याग करावा पण ताठा नसावा.

■ स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.

■ आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.

■ स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.

■ घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.

■ माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.

■ सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा !

■ मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.

■ श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.

■ ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.

No comments:

Post a Comment

Popular Posts