Monday, 1 February 2016

आदर्श विद्यार्थी

एकदशशतसहस्त्रायुतलक्षप्रयुतकोटय: क्रमश: ।
अर्बुदमब्जं खर्वनिखर्वमहायद्मशंकवस्तस्मात् ।। ११ ।।
जलधिंचान्त्यं मध्यं परार्धमिति दशगुणोत्तरं संज्ञा: ।
संख्याया: स्थानानाम् व्यवहारार्थं कृता: पूर्णे: ॥ १२ ।।
उजवीकडून डावीकडे अनुक्रमाने
एकं दहं शतं सहस्त्र अयुत (दशसहस्त्र) लक्ष प्रयुत (दशलक्ष)
कोटि अर्बुद (दशकोटि) अब्ज खर्व निखर्व महापद्म शंकु
जलाधि अंत्य मध्य परार्ध /परार्ध = १०१८)
संस्कृतात १०५४ पर्यंत संज्ञा आहेत..

ज्ञानतृष्णा, गुरौनिष्ठा, सदाअध्ययनदक्षता
एकाग्रता, महतेच्छा, विद्यार्थी गुणपञ्चकम् ।
ज्ञान मिळविण्याची उत्कट इच्छा, शिक्षकांवरील श्रध्दा, अभ्यासाबद्दल
सतत तत्परता, मनाची एकाग्रता आणि महत्त्वाकांक्षा हे पाच गुण
विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक आहेत.
हस्तस्य भूषणं दानं, सत्यं कण्ठस्य भूषणम्
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम् ।
दान करणे हा हाताचे भूषण - अलंकार आहे. नेहमी खरे बोलणे
हे गळयाचे भूषण आहे. शास्त्र-अभ्यास-ऐकणे हे कानांचे भूषण आहे.
ही भूषणे जवळ असताना इतर अलंकारांची आवश्यकताच काय ?
 
हस्ताक्षरं समीचीनं मित्रं ज्ञेयं चिरंतनम्
तत् एव विपरीतं चेत् शत्रुवत् गण्यते बुधै: ।
वळणदार, सुंदर हस्ताक्षर हा माणसाचा कायमचा मित्र आहे.
वाईट अक्षराला विचारवंत लोक शत्रूप्रमाणे मानतात.

औषधेषु अपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह
स्वाधीनं सुलभं च अपि आरोग्यानंद वर्धनम् ।
सर्व औषधांमध्ये हास्य हे श्रेष्ठ औषध आहे असे शहाणे लोक म्हणतात,
कारण ते स्वत:च्या ताब्यांत असलेले,
सहज मिळण्याजोगे, आणि आनंद व आरोग्य वाढवणारे आहे.

विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनम्
विद्या भोगकरी यश: सुखकरी विद्या गुरुणां गुरू:
विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम्
विद्या राजसु पूज्यते न हि धनं , विद्याविहीन: पशु: ।
विद्या हे माणसाचे उत्तम सौंदर्य आहे. विद्या हे अत्यंत सुरक्षित व गुप्त धन आहे. विद्या माणसाला ऐश्वर्य, कीर्ती व सुख प्राप्त करून देणारी आहे. विद्या गुरूंची गुरू आहे. परदेशांत विद्या माणसाला बांधवासारखी उपयोगी पडते. विद्या सर्वश्रेष्ठ देवता आहे. विद्येचा व विद्वानांचा गौरव होतो, धनाचा श्रीमंतांचा नाही म्हणून विद्या नसलेला माणूस पशूच समजावा

गौरवं प्राप्यते दानात् न तु वित्तस्य संचयात्
स्थितिरुच्चै: पयोदानां,पयोधीनाम् अध: स्थिती ।
दान केल्यामुळे माणसाला मोठेपणा मिळतो. धनाचा साठा केल्यामुळे नाही.
पाणी देणार्‍या मेघाचे स्थान उंचावर असते.
तर पाण्याचा साठा करणारा समुद्र नेहमी खाली असतो.

न काष्ठे विद्यते देवो, न पाषाणे न मृण्मये
भावे हि विद्यते देव: तस्मात् भावो हि कारणम् ।
खरे पहाता देव लाकडाच्या मूर्तीत नसतो. दगडाच्या मूर्तीत नसतो किंवा मातीच्या मूर्तीत नसतो.
देव माणसाच्या भक्तीभावांत असतो. मनापासून भक्ती करणे हीच खरी उपासना आहे.

परस्परविरोधे तु वयं पञ्च ते शतम्
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम्
(धर्म सांगतो) ते आपआपसात विरोध असेल तेव्हां आम्ही पाच व ते शंभर आहेत. परंतु परकीय आक्रमण होते तेव्हा आम्ही एकशे पाच असतो.

सर्वsपि सुखिना: सन्तु सर्वे सन्तु निरामया:
सर्वे भद्राणि पश्यन्तु, न कश्चित दु:खम् आप्नुयात्
सर्वजण सुखी असोत, सर्वजण निरोगी असोत, सर्वांचे नेहमी भले होवो. कोणालाही दु:ख नसावे.

No comments:

Post a Comment

Popular Posts