▪पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज)
▪दुर्जनाला वेदांतात बुडवले तरी त्याला सुजनत्व येत नाही.
▪त्याग हा सर्व प्रकारच्या कलेचा बिंदूच आहे. (महात्मा गांधी)
▪युध्दाची खरी भयानकता त्यात माणसे मरतात ही नसून माणूस माणसाला मारायला तयार होतो ही आहे.
▪जगात काही अजरामर नाही तुमच्या चिंतासुध्दा!
▪जेष्ठत्व केवळ वयामुळे नाही तर गुणांमुळे येते.
▪लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक होय.
▪आपले विचार वाळूत लिहा, क्षमेचे वारे त्यांना उडवून लावेल. आपले सुख दगडात कोरा, ते कोणीही खोडू शकणार नाही.
▪सत्तेपेक्षा सामर्थ्य महत्त्वाचे असते.
▪माणसाने आपल्या भरवंशावर जगावे.
▪दीपज्योतीमध्ये असे सामर्थ्य आहे की स्वत: प्रज्वलीत होऊन दुसयाला प्रजलीत करते.
▪आयुष्यात निश्चित काही मिळवावयाचे असल्यास साहस असावयास पाहिजे.
▪सानेगुरूजीचे वाड्मय म्हणजे संस्काराचा झरा !
▪उगीच जिथे रूजत नाही तेथे बी पेरू नये.
▪जिथे मोल जाणत नाही तिथे शब्द टाकू नये.
▪संस्कारामुळे माणसाला खरे माणूसपण येते.
▪ग्रंथहीन घर म्हणजे देहहीन शरीर.
▪शब्द जपून वापरावेत, शब्दांची धार तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे.
▪कलीयुग कलीयुग म्हणू नका कलीयुगाला कलायुग बनवा!
▪मृत्यु नेहमी समीप आहे धरून चालावे त्यामुळे मन वैराग्याकडे वळते.
▪अंहकार आणि लोभ हे माणसांच्या जीवनातील सर्वात मोठे दु:ख आहे.
▪चंद्र आणि चंदनापेक्षा सज्जनांचा सहवास शीतल असतो.
▪काजव्याला वाटते जग आपल्याच लुकलुकण्यामुळे उजळले आहे.
▪कर्तव्यदक्ष असावे पण कर्मठ नसावे.
▪उत्साही असावे पण उतावीळ होऊ नये.
▪कृतज्ञ असावे पण कृतघ्न नसावे.
▪पवित्र असावे पण पतित होऊ नये.
▪त्याग करावा पण ताठा नसावा.
▪स्वाभिमान असावा पण गर्व नसावा.
▪आत्मविश्वास असावा पण अंहकार नसावा.
▪स्वतंत्र असावे पण स्वैर नसावे.
▪घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही.
▪माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
▪सुखी होण्यासाठी सुखी होण्याचा मार्ग म्हणजे निसर्गावर, नियतीवर, परमेश्वरावर कोणावर तरी विश्वास ठेवा!
▪मानवी संबंध धावणाया आगगाडीच्या वेळापत्रकाप्रमाणे नसतात...ते असतात औदुबंराच्या आडव्यातिडव्या पाय वाटासारखे.
▪श्रध्दा ही सामर्थ्यवान असते. कशावर तरी श्रध्दा ठेवल्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही.
▪ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते त्यालाच वेळ घालविण्यासाठी साधन शोधण्याची गरज भासते.
- मुख्य
- यु डायस शोधा
- MDM लॉगिन
- शासन निर्णय
- महाराष्ट्र शासन
- अहमदनगर जिल्हा परिषद
- RTE-2009 नुसार मुख्याध्यापकांची कामे
- शाळा स्तरावरील अभिलेखे यादी
- इ साहित्य (पुस्तके PDF)
- परिपाठ गीते (ऑडियो )
- शासननिर्णय कसा शोधावा
- आजचा पेपर
- आदर्श ध्वजसंहिता
- मराठी संत
- मराठी इतिहास
- बालकथा
- ई-मेल लॉगिन
- संगीतमय पाढे
- विज्ञान सोपे प्रयोग
- शिक्षकांची भूमिका
- शैक्षणिक पाठयपुस्तक
- शिक्षक पात्रता परीक्षा
- तंत्रस्नेही शिक्षक नोंदणी
Recent Posts
Monday, 1 February 2016
सुविचार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
• कला शिक्षण अभ्यासक्रम आराखडा • कार्यानुभव शिक्षण अभ्यासक्रम आराखडा • शारीरिक शिक्षण अभ्यासक्रम आराखडा
-
प्रसूती रजा शासननिर्णय प्रसूती रजा स्पेशल gr download साठी GR च्या नावावर click करा राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल स...
-
गोपनीय अहवाल GR गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणाली...
No comments:
Post a Comment